Where: Art of Living Sabhagriha, Plot No. 109, Kansai Section, Ambernath When: 3rd and 4th Feb 2012 – 6:30pm to 8:30pm; 5th Feb 2012 10:30 to 12:30pm ख्यालाचा विचार करताना राग, स्वर, वांग्मय, ताल, काल, आणि भाव यांचा विचार अपेक्षित असतो आणि तद्नुसार प्रत्येक प्रतिभावान कलाकाराची राग- स्वरूपा कडे पाहण्याची स्वतःची अशी दृष्टी असते. कला संगीतातील (शास्त्रीय संगीतातील) नव निर्मिती आणि परिवर्तन याचा अभ्यास करण्यासाठी अशी दृष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक असते त्याचप्रमाणे ख्यालाच्या बढती मध्ये प्रत्येक आवर्तन ही एक परिपूर्ण कलाकृती असून आवर्तनांच्या मालिकेतून सांगीतिक सौंदर्याचा संवाद श्रोत्यांशी घडत असतो आणि आवर्तन भरणे ही ख्याल गायनाची मुख्य कसोटी आहे. आपणा सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो कि या सगळ्या प्रक्रियेविषयी चर्चा ,प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शना साठी सुप्रसिद्ध गायक ,संगीत संग्राहक ,अभ्यासक पंडित सत्यशील देशपांडे यांनी एक तीन दिवसीय कार्यशाळा घेऊन नवोदित व उदयोन्मुख कलाकारांना तसेच संगीत अभ्यासकांना मार्गदर्शन करण्याची आमची विनंती मान्य केली आहे …. ही कार्यशाळा दिनांक ३/०२/२०१२ सायंकाळी ६.३० ते ८.३० ४/०२/२०१२ सायंकाळी ६.३० ते ८.३० ५/०२/२०१२ सकाळी १०.३० ते १२.३० या दिवशी ‘आर्ट ऑफ लिविंग सभागृह’,प्लॉट क्रमांक-१०९,कानसाई सेक्शन,अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केली आहे. यासाठी तीनही दिवसांचे मिळून शुल्क रुपये ३००/- इतके नाममात्र ठेवण्यात आले आहे . तरी इच्छुकांनी ह्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा . संपर्क : भूपाल पणशीकर डॉ.वसंत
Continue readingRaag Svaroop Ani Vistaar – Workshop at Ambernath